चोरबाजार
चोरबाजार

1 min

198
चोरांच्या बाजारी I फिरण्याची चोरी
नसता बळजोरी I ठरलेली
चोरांची दुकाने I ग्राहकही चोर
चोरावर मोर I कधी कधी
सावाच्या शेजारी I चोराची पथारी
सावाला शिरशिरी I चोरीची
सगळीकडे चोर I मनी माझ्या घोर
देवा तूचि थोर I वाचवी मला