स्वर मौन झाले - उद्धव भयवाळ
स्वर मौन झाले - उद्धव भयवाळ


गानकोकिळेचा आज थंडावला स्वर
मंगेशीच्या गाभाऱ्यात झाला अंधःकार
मधुमुलायम स्वर आज मौन झाले
स्वर्गी तिथे गंधर्वाचे डोळे पाणावले
स्वर्गाच्या वाटेवरती अत्तराचे सडे
दिदीच्या स्वागताला देव सारे खडे
अशी स्वरलता आता पुन्हा होणे नाही
गानरुपी भेट मात्र सदा होत राही
तिच्या गाण्यासाठी मना लागे पिसे
लता दीदी आमच्या हृदaयांतरी वसे