जमेल तितके
जमेल तितके
1 min
140
जमेल तितके प्रेम केले क्रोधही केला जमेल तितका
जमेल तितके कर्म केले धर्मही केला जमेल तितका
वैऱ्याशीही करून दोस्ती मित्र जमविले जमतील तितके
शल्य मनातील कुणा न वदलो अंतरी रडलो जमेल तितके
काटेरी त्या वाटेवरती चालत गेलो जरी एकटा
आधी त्यावरी फुले अंथरून साथी घेतले जमतील तितके
आहे इच्छा आनंदाने कंठीन जीवन उरले जितके
मृत्यूला सामोरे जाईन हसतमुखाने; जमेल तितके
