अचानक
अचानक


तिसऱ्या प्रहरीच जणू अचानक तिन्हीसांजा जाहल्या
संध्याछाया भवती अवचित फेर धरू लागल्या
डोळ्यांमधली स्वप्ने मोठी मनास देती पुष्ट उभारी
गगनाला गवसणी घालण्या, घेईन वाटे उंच भरारी
भलत्या वेळी मन हे विव्हल, डोळ्यांच्या अन् कडा ओल्या
संध्याछाया भवती अवचित फेर धरू लागल्या
गतकाळाच्या गोष्टी आठवून, सुखद तयांच्या शिदोरीसह
चालेन म्हणतो रस्ता पुढचा, प्रसंग येवो कितीही दु:सह
मनाच्याही अंतर्मनात पण, ठसठसती या जखमा ओल्या
संध्याछाया भवती अवचित फेर धरू लागल्या