STORYMIRROR

Uddhav Bhaiwal

Others

3  

Uddhav Bhaiwal

Others

जमेल तितके

जमेल तितके

1 min
195

जमेल तितके प्रेम केले 

क्रोधही केला जमेल तितका 

जमेल तितके कर्म केले 

धर्मही केला जमेल तितका

 

वैऱ्याशीही करून दोस्ती 

मित्र जमविले जमतील तितके 

शल्य मनातील कुणा न वदलो 

अंतरी रडलो जमेल तितके 


काटेरी त्या वाटेवरती 

चालत गेलो जरी एकटा 

आधी त्यावरी फुले अंथरून 

साथी घेतले जमतील तितके 


आहे इच्छा आनंदाने 

कंठीन जीवन उरले जितके 

मृत्युला सामोरे जाईन 

हसतमुखाने; जमेल तितके 


Rate this content
Log in