अबोल प्रेम
अबोल प्रेम
आडोश्यातून तुला पाहण्याची,
मला खूपच आवड
सांग सखे मिळेल केव्हा,
तुला भेटण्याची सवड...
ओठात गोठतील तेव्हा,
मनातले तराणे
लपून जपून पाहणारे,
नेत्र असणार दिवाणे...
भावनांच्या ओघात तेव्हा,
शब्द वाहून जाणार
सांगतो सखे तेव्हाच,
आपले प्रेम वेगळे वळण घेणार...
नेत्रभेटीतच पूर्ण होते,
आपली अबोल प्रिती
मनातले तुजजवळ सांगताना,
मी शब्द खर्चू किती...
राणी शब्द खर्चू किती...

