सांगावसं वाटल म्हणून....
सांगावसं वाटल म्हणून....
सांगावसं वाटलं म्हणून,
सांगतोय मनातलं.
अधीर न होता,
उरातलं गुपित,
कोणाच्याही भावनेला न दुखवता.
तू समजुन घेशील म्हणून.....
बोलावंसं वाटलं म्हणून,
बोलतोय,
सर्व शब्दांचे पारिजात,
तुझ्या अंगणात सजवून.
सुगंध दळवळून.
माझे अंतरंग तुज जवळ उलघडावे म्हणुन.....
मांडावसं वाटलं म्हणून,
मांडतोय,
माझे मत तुझ्याजवळ,
जिंकण्याच्या धुंदीत
जपता न आलेले नाते,
तुझ्याकडे तू नेहमी जपले म्हणून.....
अन्वय मुक्तेय