गीत प्रीतीचे
गीत प्रीतीचे

आयुष्य आहे गीत प्रीतीचे, रचू या नव्या सुरांनी
ओठांतल्या स्वरांना माझ्या, आज वाट नाही
वादळात तव विरहाच्या, हरवले सर्व काही
जवळ येऊनही दूर दूर, का राहावे दोन मनांनी
आयुष्य आहे गीत प्रीतीचे, रचू या नव्या सुरांनी
अश्रूंत आज माझ्या, भिजल्यात सर्व वाटा
त्या प्रीतसरींनी इथेच केली, अमर आपली गाथा
करावी किती आर्जवे अजून, माझ्या प्रीतीत या फुलांनी
आयुष्य आहे गीत प्रीतीचे, रचू या नव्या सुरांनी
इथेच पुरवले तुझे गडे मी, भाववेडे रुसावे
इथल्याच हिंदोळ्यावर देऊ या, प्रीतीस हेलकावे
प्रीत आपली अमर करू या, अशाच धुंद क्षणांनी
आयुष्य आहे गीत प्रीतीचे, रचू या नव्या सुरांनी