STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance Others

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance Others

साथ जन्मभर दे

साथ जन्मभर दे

1 min
207

मी तुला समजून घेतो

तू मला समजून घे,

दोघांच्याही होतील चुका

त्या सोडून साऱ्या दे,

दिला आहे हात हाती

साथ जन्मभर दे....


रंगरुपाचं वर्णन तुझ्या

होणार मुळी नाही,

तुला हवं ते हवं तेंव्हा

मिळणार ही नाही,

सुख दुःख भोग सारे

आहे नशिबी जे...


लाड कौतुक नाही मुळी

होणार हौस तुझी,

तुला मिरवता येणार नाही

राणी बनून माझी,

कष्टाची चटणी भाकरी

गोड माणून तू घे....


माझीही असेल मजबुरी

ठेव भरोसा माझ्यावरी,

माझं अर्पण सर्वस्व तुला

दुःखीच का ग तू तरीही,

पतीपत्नीच्या नात्याला या

अर्थ खरा तूच दे....


हाटेलपार्टी, टूर, पिक्चर

नाही फिरायला जाणं,

साऱ्या कुटुंबाची सेवा

हेच तुझं आहे जिणं,

जरी आले अश्रू डोळा

पुसून तुच ग घे....


सुखदुःख भोगायचं

स्वाभिमानाने जगायचं,

उम्मेदिने जगता जगाता

आयुष्य देवाला मागायचं

पटलं न पटलं माझं तरी

सारच ऐकून माझं घे....


नशीब फुटकं समजू नको

दोष दैवाला देऊ नको,

जन्माचं नाही चिज झालं

म्हणून वाईट वाटून घेऊ नको,

खरं असेल प्रेम तुझे तर

आगं मिठीत जरा ये...


माझ्या कडून करू नकोस फार अपेक्षा,

जन्मभर झाली जरी तुझी उपेक्षा,

संयम ठेव नको म्हणू

मरण बरे या पेक्षा,

पुढच्या जन्मी मलाच तू

त्या देवास मागून घे....


मीच वडाला फेऱ्या मारीन

वाटेल ते नवस करीन,

माझी हार,जित तुझीच

तुझेच ग पाय धरीन,

जन्मोजन्मी हवीस तू मला

राणी जन्म दुसरा घे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance