Chandrakant Dhangawhal

Romance


3  

Chandrakant Dhangawhal

Romance


*रोज सकाळी गुलाब**ती येण्याची

*रोज सकाळी गुलाब**ती येण्याची

1 min 169 1 min 169

रोज सकाळी गुलाब

ती येण्याची वाट बघायचा

तिच्यासाठीच तो सुगंध दरवळायचा


मोगराही तिच्यासाठीच 

उमलायचा

तिच्या गालावरच हसु

पाहून फुलायचा


पण ती फक्त गुलाबालाच बघायची

जवळ जावून त्याला अलगत मिठीत घ्यायची


तिचा लडिवाळ पाहून

मोगरा जरा रूसायचा

रागात तिला म्हणायचा

कधीतरी एक नजर

माझ्याकडेही बघत जा

प्रेमाणे मलाही कवेत घेत जा


तू हजारदा त्या गुलाबाला पाणी घातलेस तरी

तो तुला काटेच टोचणार आहे

अगं या मोगऱ्याच्या गजऱ्याशिवाय

तू कुठे सुंदर दिसणार आहे


तुला सांगू का.....

तुझ्या वेणीला गजऱ्याचाच लळा लागतो

म्हणूनतर द्रुष्ट लागेपर्यंत

आरसा तुला एकसारखा

टक लावून बघतो


Rate this content
Log in

More marathi poem from Chandrakant Dhangawhal

Similar marathi poem from Romance