प्रेम हे...
प्रेम हे...


सांगेल कुणी मज, हे झाले कसे
मन जाहले अधीर, श्वास वेडेपिसे
सखे प्रेम माझे तुला सांगताना
मज वाचले फुलांनी, शब्द झाले मुके
विरले किनारे सारे, आज जागृतीचे
गडे तुलाही स्वतःचे, भान आहे कुठे
स्वर्गानुरूप वाटतील तुला, रम्य हे नजारे
असे गालिचे फुलांनी, पांघरावे इथे
सोहळा या मीलनाचा, का जगाने पाहावा
भोवताली नभाने, सांडले ते धुके
सूर आज माझे, तुझे तोलतील श्वास
मांडून सांजवेळी, तारकांची गीते