STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आबादानी

आबादानी

1 min
246

हात चालवे कृषीवल

पेरणीस लई वेगानी

मनी आस लई झुलते

आवंदा होवो आबादानी   (१)


केली वरुणाने किरपा

रिमझिमते धाराराणी

सुर्व्यानं प्रकाश दिलाया

रोपं आली हो बहरुनी    (२)


नवनवीन येता तंत्र

उपक्रम हो राबिवला

खतं बियाणं आनल्याति

शहरातूनी आवंदाला    (३)


घरादारातली समदी

लई शेतात राबलोया

मळणी जोमानं क्येल्याली

खळं उदंड भरलंया    (४)


आता चारा हो मायंदाळ

जितराबं खुशीनं खुळं!!

अस्तुरीला घेईन मणी

दुद प्येतिल पोरंबाळं   (५)


मोती फुलले घामातून

पीक आलं भरभरुन

सार्थक करसि कष्टाचं

झालंया देवा , समाधान!!  (६) 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract