STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Abstract

4  

Sakharam Aachrekar

Abstract

सांग ना एकदा भेटशील का मला?

सांग ना एकदा भेटशील का मला?

1 min
4.0K

सूर्याची कोमल किरणे जेव्हा पर्वतावर डोकावतील

मंजुळ गीत तयांचे भाट अन पक्षी गातील

घरा पलिकडल्या माझ्या मोकळ्या कुरणांवर

सांग ना एकदा भेटशील का मला?


वसंताच्या अस्तावेळी वर्षा च्या कोवळ्या जलधारा

मृदेच्या अत्तराने दरवळलाय आसमंत सारा

प्रतीक आपल्या प्रेमाचे बनेल तो निर्मळ झरा

तुषार त्या झर्याचे घेण्या अंगावर

सांग ना एकदा भेटशील का मला? 


सूर्यास्तानंतर जागतील मग जुन्या आठवणी

समाधानाने पेटवू आपल्या उरल्या आयुष्याची धुनी

घेईन निशब्द शंका मी तुझ्यासह कवेत

मग का जाणवेल दुरावा उबदार त्या हवेत?

श्रींगार अप्सरेचे अन साज लेण्या

सांग ना एकदा भेटशील का मला? 


शांत सागरावरही लाटा गुंजन असतील करत

उल्हसित आनंदाने असतील तुलाच स्मरत

मृगजळ आपल्या प्रेमाचे जाईल तिथे विरत

जिथे रात्र असेल अजून पाण्यात अन दिवस किनार्‍यालगत

शरीर जेव्हा संपेल अन आत्मा घेईल श्वास

सांग ना एकदा भेटशील का मला? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract