तळ .... !
तळ .... !
भोवतालच्या कल्लोळातला आकांत
ओठातच लुप्त झाला की ,
काळोखाच्या दाटीवातीत
आवाज गेला दबून
कळणंच झालं कठीण ....
म्हटलं
विश्रांत झालेल्या राखेलाच
करावा प्रश्न
की का अस ?
तर तीही वाहत्या जलात
खोल .... खोल
तळाच्या शोधात
समाधिस्थ होण्यासाठी ....!!!!