STORYMIRROR

Deepak Warungase

Abstract

5.0  

Deepak Warungase

Abstract

तिचं जग

तिचं जग

1 min
474


खिडकीबाहेरचं जग तिला अनोळखी असलं तरी मनाच्या शेवटच्या पदड्यापर्यंत ओळखते ती सर्वांना.... 


तिरीही तिला शोध घ्यायचाच होता... 


अनोळखी होतं सगळं म्हणूनच का केवळ..? 


तिने मनाचा थांगपत्ता शोधूच नाही दिला कधी... 


पण खिडकीच्या आतलं जग तिचं हक्काचं.. 


तळहातावरच्या फोडाप्रमाणे नाजुकपणे जपणारं... 

होऊ देत वेदना कितीही हाताला तरी श्वास न चुकवता सांभाळणारं... 


मग ती रममाण होते तिच्या खिडकीच्या आतल्या जगात... 


विसरते वेदना मनातल्या आणि विरून लावते दुःख तिच्या ह्रदयानजिक जगाचे... 


हसते, बागडते, स्वतःतलं लहान मूल तेवत ठेवत इतरांचं बालपण जागं करते....


परंतु खिडकीच्या आतलं जग ओळखीचं तरीही मनात साठलेल्या अनेकविध छटांना अनोळखी ठेवण्याची तिची धडपड.... 


मग जरा विचाराधीन होऊन ती खिडकीपाशी बसते. खिडकीच्या काचात स्वतःला निरखत स्वतःशीच जरा विक्षीप्त हसते. 

अजून थोडी नजिक जाऊन स्वतःलाच डोळ्यात भरून घेते. 


प्रतिबिंब डोळ्यात साठते न साठते तोच तो क्षण छायाचित्रात कैद करते.


तिथून उठते, खोलीत टेबलाजवळच्या खाटेवर विसावते. कैद केलेली छायाचित्र बघत, स्वतःशीच पुटपुटत जरा उशीवर डोकं टेकवतं ती डोळे मिटते... 


अन् क्षणात.. 


नजरेपल्याड मरणासक्त लाटा उसाळ्यागत विचारांचे टाहो उसळू लागतात. अवतीभवती चे सर्वच ताशेरे, कुचंबणा करणाऱ्या शब्दांच्या खैराती फेर धर

ू लागतात. अनेक सहन न होणाऱ्या आठवणी कोळीष्टकांची जाळे विणू लागतात...


मग ती गदमरते आतच, अन् रोखू पाहते त्या बोचणाऱ्या शब्दांना, अंतरंगातून संपवणाऱ्या त्या नजरेला, ञाही ञाही करून सोडणाऱ्या त्या संवादाला.... 


पण असह्य...


मग अनेक मुखवटे डोळ्यांसमोर आकार धरतात. कुजबुज सुरू होते... स्वमनातच संवादांच्या अनेक फैरी झडतात... 


नको... आता ... खरचं नको...


असं अनावधानानेच स्वतःशी म्हणत ती त्वेषाने कच्चकून घट्ट डोळे मिटते अन् सर्व काळकुट्टं होत जातं... 


आता बाहेर गडद अंधार दाटून आलाय हे तिला जाणवतं.

मग तिच्या अवती भोवती पसलेल्या कागदांना डोळे फुटतात, ते तिला त्यांकडे खेचू पाहतात. सर्वदूर पसरलेले कागद, कॅनव्हास तिच्या नजरेक्षेपात येऊन उभे ठाकतात. 


आता आपल्या रंगांशिवाय अन् शब्दांशिवाय आपलं कोणीचं नाही. 


मग ती अलवार उचलते कधी लेखणी वा अनेक मनाच्या रंगछटांनी माखलेला ब्रश... 


आणि टेकवते समोरच्या कागदावर... 


रितं करते स्वतःला, स्वतःच्या निर्विकार मनाला, स्वतःच्या अंकुरित भावनांना, स्वतःच्या खिडकी आतल्या जगाला... 


फक्त आणि फक्त स्वतः साठी... 


उभी राहते एकटक बघत बेफामपणे उधळलेल्या गडद रंगांकडे, अनेक सररंगांनी रंगलेल्या शब्दांकडे... 


मग तिची चिञं, तिच्या कथा, कविता मग तिलाच ओळखू येऊ लागतात अगदी खिडकी आतल्या जगासारख्या.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract