प्रवास माझा
प्रवास माझा
1 min
399
बोल कडवट माझे जरासे
ते जिव्हारी लागले
उमगले न शब्द तुझे
अन् रचियला मी, कयास माझा
उकलूनी त्या पाऊलखुणा
वाट आता गावते
मोडून चौकट उघडेन दार
अन् पुर्ण करेन मी, बंदीवास माझा
हरवलेल्या वाटांवरी त्या
ना शिखर नजरेत दिसे
मन सांगे देऊन हिसका
हीच वाट माझी अन्, प्रवास माझा
