अशी चालत यावी ती नार..
अशी चालत यावी ती नार..
लेवूनी नयनांची धार
करूनी गोजिरा शृंगार
नाजुकसा देऊनी जिभेवर भार
अशी चालत यावी ती नार..
ल्यावे तलम शुभ्र वस्ञ
नजर जसे की जीव घेणे शस्ञ
बघता रोखून न तुटणारी तार
अशी चालत यावी ती नार..
माळूनी फुलांच्या माळा
हातात तिच्या हिरवा चुडा
बोलताच ओठांची व्हावी मारामार
अशी चालत यावी ती नार...
मज वाटे
जवळी तिच्या बसावे
गुंफूनी हातात हात आयुष्य हे सरावे
भेटताच ती होतील अश्रु डोळ्यापार
फक्त चालत यावी ती नार...