STORYMIRROR

Deepak Warungase

Others

4  

Deepak Warungase

Others

आठवण..

आठवण..

1 min
396

पाहतो जेव्हा तुला मी

तुजविण काही रूचतच नाही

मनी असते अबोल भाषा

आठवूनही शब्द सुचतच नाही.


ठरवतो मनी मी

रोजच काही बोलायचे

उघडून मनाचे सर्व पडदे

अंतरीतून तुला खुलवायचे

व्यर्थ ठरतात सर्व मनसुबे

अन् कळ्या उमलतच नाही

मनी असते अबोल भाषा

आठवूनही शब्द सुचतच नाही.


आठवणीत तुझ्या दिवस कंठतो

राञीही तळमळत विरून जातात

स्मरतात अभूतपुर्व सुरेल गोष्टी

स्वप्नांच्या स्वार होऊन येतात

प्रभात स्पर्शाने उघडतात डोळे

अविस्मरणीय प्रवासात सोबतच नाही

मनी असते अबोल भाषा

आठवूनही शब्द सुचतच नाही.


मी वेचतो क्षण अन् क्षण

अन् लागतो सुगंधामागे अधाशासारखा

ओंजळीत उचलतो फुले अनामिक

पण गंध होतो मला पारखा

माझीही दरवळ कधी आठवून बघ

बदललेत ऋतू पण माझ्यात बदलच नाही

मनी असते अबोल भाषा

आठवूनही शब्द सुचतच नाही.


Rate this content
Log in