एक सायंकाळ अशीही यावी.
एक सायंकाळ अशीही यावी.
एक सायंकाळ अशीही यावी
तुझी मला सोबत असावी
उकलुनी आठवणीतील गुजगोष्टी
नव्याने आपली प्रित फुलावी.
एक सायंकाळ अशीही यावी
भावनेला माझ्या वाट मिळावी
ह्रदयातील गंधाची करता उधळण
नाजूक कळी जशी खुलावी.
एक सायंकाळ अशीही यावी
आस प्रितीची तुजला कळावी
परतवूनी तुझा प्रतिसाद मिळता
इच्छा देवामनीची मजला फळावी.
एक सायंकाळ अशीही यावी
सांजवेळ ही कधी न सरावी
गुंफूनी हात टेकवूनी माथा
साक्ष देत नभी चांदणं पसरावी.
एक सायंकाळ अशीही यावी
तुझी-माझी वचने मिळवावी
घेऊनी निरंतरता भास्करासम
साथ आपण जन्मोजन्मीची निभवावी.

