मैत्री
मैत्री
बरा असावा निखळ संवाद,
पण नसावी जिभेवर कात्री
कधी नसावं त्यात राजकारण,
मग फरक काय स्वतः नि मंत्री
तरी काहींत असतो भेदभाव,
जशी असतात विभिन्न गोत्री
विश्वासच देतो सदा आश्वासन,
टिकते आयुष्यभर पुर्ण खात्री
आयुष्य होते एक सुरेल संगीत,
जसं सुर तारा लावुन वाद्यतंत्री
जेव्हा असतो तो खांद्यावर हात
तेव्हाच खुलते लख्ख खरी मैत्री