बहर
बहर
पावले झाली उधाण
बघता पावसाला आलेला जोर ....
बहरलेल्या वसंत ऋतुला पाहुन
मन सुखावून किशोर ....
सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसता
डोलणारे बेधुंद मोर ....
प्रेमात पडलेल्या सोहळ्याला
खेळते ती शब्दांची नजर ....
भेटतांना दिली अशी भेट
आणि अवचित घडले फार ....
नकळत पडलेल्या प्रश्नावर
असे कळलेले ते उत्तर ....
जसा दरवळणारा सुगंध
जणु काही ते अत्तर ....
सप्तसुरांच्या या नात्यांना
न पडणारे हे अंतर ....
