STORYMIRROR

Sharad Kawathekar

Abstract

4  

Sharad Kawathekar

Abstract

खिडकी

खिडकी

1 min
321

मी खिडकीत उभाय

उगीचच बाहेरच जग न्याहळतोय

खिडकी पलीकडंच अफाट जग

काही ठिकाणी सुख

उगीचच चकाट्या फेटत 

बिडीचे झुरके सोडत उभंय

तर काही ठिकाणी 

उघडी वाघडी नागडी दुःख 

तर काही रंजलेली गांजलेली दुःख 

या सा-या दुःखासोबत 

चार टाळकी स्वप्नाची शवयात्रा 

घेऊन जाण्यात व्यस्त दिसत होती

स्वप्नाची शवयात्रा ...

सोबत होते काही 

काही धूळीचे कण

काही धूळीनं माखलेल्या चांदण्या

ते क्षण मी कोरून घेतोय

माझ्या मर्यादित डोळ्यांत आणि 

माझ्या सीमित मेंदूत 

मीही सामील होतोय मनानं 

खाली मान घालून आणि हात मागं बांधून 

चालत राहतो एक यात्रेकरू बनून 

आणि अचानक एक आवाज आला....

" स्वप्नं जगण्यासाठी आवश्यक आहे, मृत्यूला दूर ठेव

इच्छेत स्वप्नं बघ

तिरस्कारात स्वप्नं बघ

संघर्षात स्वप्नं बघ

स्वप्नात स्वप्नं बघ "

आणि मी त्या अफाट जगातून

खिडकी मागच्या जगात आलो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract