STORYMIRROR

Nilesh Bamne

Abstract

4  

Nilesh Bamne

Abstract

ऑनलाईन

ऑनलाईन

1 min
382

होते चुकामुक आमची 

ऑनलाईनवर...

मी लाईनवर असताना 

ती लाईनवर नसते

आणि ती लाईनवर असताना 

मी लाईनवर नसतो

ती ऑनलाईन असताना 

मी झोपलेलो असतो 

मी ऑनलाईन असताना 

ती झोपलेली असते

मला वाटतं 

ती मला टाळतेय 

तिला वाटतं 

मी तिला टाळतोय

खरं म्हणजे आता

कंटाळा आलाय

ऑनलाईन असण्याचा

तिला आणि मलाही...

पाहतो आम्ही एकमेकांना

फक्त फोटोत 

आणि अपडेटही 

घेतो एकमेकांचे

फक्त फोटोतच 

आमचे शब्द 

आमच्या ओठातुन

नाही बोटातुन बाहेर येतात

ते ही अपूर्ण 

आता तर वाटू लागलंय

आमचं प्रेमच नाही एकमेकांवर

कारण यंत्र कधी यंत्राच्या

प्रेमात पडत नाहीत

प्रेमात माणसं पडतात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract