STORYMIRROR

Nilesh Bamne

Others

3  

Nilesh Bamne

Others

पंख

पंख

1 min
185

शेवटी छाटले गेले पंख तुझेही...

तू स्त्री असण्याची किंमत मोजावी लागली तुलाही...

तुला काय हवे ? तुझी इच्छा काय आहे ?

हे कोणीच विचारले नाही तुला शेवटी ...

तू झालीस शेवटी भातुकलीच्या खेळातील बाहुली...

इतरांच्या स्वार्थासाठी शेवटी बळी मात्र फक्त तुझाच दिला गेला...

नाईलाजाने तू ही भावनेच्या भरात

स्वत:ला झोकून दिलेस आयुष्यभारासाठी

नको असलेल्या नात्याच्या बंधनात ...

ते नाते आता नाईलाजाने का होईना तू निभावशीलही...

पण उडू शकशील का कधी पुन्हा तुझ्या स्वप्नांच्या नभात...

पूर्वीसारखी ....


Rate this content
Log in