सिंह झालेले गाढव
सिंह झालेले गाढव
सिंह झालेले गाढव
मी ह्या उघड्या डोळ्यांनी पाहिले —
जंगलात कित्येक गाढव सिंह होताना,
आणि कित्येक सिंह गाढव होताना...
जंगलाचा खरा राजा सिंहच होता,
पण आज जंगलात गाढवालाही
राजाचं मान मिळालं आहे.
कारण जंगलात सिंहाचे नाही,
तर गाढवाचे समर्थक जास्त झालेत...
आज गाढवाला मिळणारे समर्थन पाहून
सिंहही स्वतःला शेळी समजू लागला आहे.
प्रत्यक्षात नाही, पण मनाच्या आत
त्याचाही जणू लिंगबदल झाल्यासारखा आहे.
शंभर गाढवे मिळून
एका सिंहाला मूर्ख ठरवतात,
त्याला नाममात्र राजा करून
वर्षानुवर्षं जंगलावर राज्य करतात...
©कवी – निलेश बामणे ( दिनांक: 25/10/2025 )
