STORYMIRROR

Nilesh Bamne

Others

4  

Nilesh Bamne

Others

बलात्कार

बलात्कार

1 min
43

बलात्कार

बलात्कारावर कविता लिहावी
अशी इच्छा नसते... पण...

रोज येणारी एक नवीन बलात्काराची बातमी
कित्येक विचारी पुरुषांचा मेंदू सुन्न करणारी असते...

आतापर्यंत फक्त स्त्रियांवर बलात्कार होत होता,
पण हल्ली स्त्री-लिंगावरही बलात्कार होऊ लागला आहे.

माणसाच्या या जगात आता स्त्री-लिंगही सुरक्षित नाही.

आता एका वासनांध पुरुषाच्या बलात्काराची
शिकार एक कुत्रीही ठरली आहे.

ज्या पेशात आता बलात्कारी पुरुष नाही,
असा पेशाच आज शिल्लक राहिलेला नाही.

शिक्षकापासून पुजाऱ्यापर्यंत, प्रत्येक पेशात आज
बलात्कारी लपलेला आहे—बेमालूमपणे...

एकीकडे आकाशाला गवसणी घालणारी स्त्री
आणि दुसरीकडे रोज बलात्काराची शिकार ठरणारी स्त्री

पाहिली की प्रथम लाज वाटते ती स्वतःला पुरुष
म्हणून घेण्याची.

कारण प्रत्येक बलात्कारी आमच्यातीलच एक
पुरुष असतो...

©कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
05/02/2026


साहित्याला गुण द्या
लॉग इन