निर्वाण
निर्वाण
जीवन मनूजा खेळ नव्हे रे
व्यर्थ उधळायची वेळ नव्हे रे
सप्तसूरांचे जीवन गाणे
झंकारावे मधूर तराने
दारु जुगार ही फळे विषाची
तिमीरात नेई वाट नशेची
भ्रष्टाचार ही साफ चोरी
नफाखोरी नव्हे ईमानदारी
अन्याय अनिती सारे अधर्म हे
करू नये कुणी पाप कर्म हे
शांती अहिंसा बुद्धाचे अस्त्र
त्याग शिकवीते चिवर वस्त्र
वाघा सारखी फोडावी डरकाळी
सत्याची नीत गावी भूपाळी
वाहून जाता ओंगळ सारे
मेघा संगे उतरेन तारे
अनुपम होईन वसुंधरा ही
निर्वाणाची धरं वाट नरा ही
