मृद्गंध पावसाचा
मृद्गंध पावसाचा
1 min
203
मृद्गंध पावसाचा
छळतो आज आहे
शहरी जीवनाचे
मज अप्रुप आज आहे
रानातल्या झऱ्यांचे
रुप धुंद आज आहे
सृष्टीमधील गाणी
ते गातात आज आहे
उधळला खोंड रानी
तो मस्तीत आज आहे
वाऱ्यासवे फुलांचे
गुजगान आज आहे
कडकडाट आभाळी
घनघोर आज आहे
लखलखाट विजांचा
मनसोक्त आज आहे
विसरूनी गाव गेलो
पाऊस आज आहे
खिडकीत मी पहातो
मी स्वप्नात आज आहे
