STORYMIRROR

Jayesh Madhav

Abstract

3  

Jayesh Madhav

Abstract

काळोखात सुख माझे

काळोखात सुख माझे

1 min
235

जीवनात माझ्या सदा

सुख दुःखाचा बाजार

कधी गोड कधी कडू

नाही झालो मी बेजार


दिस येतो आणि जातो

दान पदरात देतो

भूक शिकवुन जाते

कधी चतकोर खातो


वाटेवरी खुप काटे

तरी तुडवत जातो

रक्त लागेल भूईला

माझा थरकाप होतो


कोण महाली रहातो

कोण झोपडी बांधतो

माझा भूमीवर बेड

मी आकाश पांघरतो


आशा उद्याची मलाही

मीही जगतो खुशाल

काळोखात सुख माझे

शोधे घेऊनी मशाल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract