STORYMIRROR

Jayesh Madhav

Abstract

3  

Jayesh Madhav

Abstract

आयुष्य

आयुष्य

1 min
276

आभाळाशी नाते माझे

मातीमध्ये पाय रोवूनी

समुद्रावरी हक्क सांगतो

लाटांवरती स्वार होऊनी


आयुष्यावर लगाम माझा

सुख दुःखाचे अर्ध्य देऊनी

एक एक हा श्वासही माझा

ह्या अश्रूंची किंमत घेऊनी


वाटेवरचे हर एक पाऊल

जपून टाकले वेळ पाहूनी

कठिण नव्हते मजला काही

कडवट अनुभव मोल देऊनी


संपेल कधीचे जीवन अपुले

थांबणार ना कुणा पाहूनी

जगून घ्यावे मना सारखे

सुख दुःखाचे गान गाऊनी


आयुष्य असे हे नसे स्वस्त ते

पडाल येथे खस्ता खाऊनी

माणूस जन्म, जो मिळे एकदा

करा सार्थकी किंमत देऊनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract