STORYMIRROR

Jayesh Madhav

Others

4  

Jayesh Madhav

Others

आला आषाढ

आला आषाढ

1 min
235

आला आषाढ महिना

घनघोर पावसाचा

राना वनात आवाज

खळखळ हो झऱ्यांचा


ढग ओथंबून येती

वारा येई घोंगावून

सरसर पावसाची

आली सुसाट धावुन


हिरवा शालू पांघरला

रानी बहर हा आला

कोंब कोंब अंकरूनी

नवा जल्लोष हो झाला


मोर नाचाया लागला

थुईथुई जंगलात

किलबिलाट करीती

पशुपक्षी आनंदात


एकादशी आषाढाची

पायी वारी विठ्ठलाची

पावसात ओढ लागे

वारकऱ्यां पंढरेची


आषाढात मेघदूत

महाकवी कालिदास

शकुंतला दृष्यंताच्या

विवाहाचा होतो भास



Rate this content
Log in