असा पाऊस
असा पाऊस
1 min
182
असा पाऊस हा आला
गडगडाट करीत
बघा कडाडल्या विजा
थयथयाट करीत
आता लगबग झाली
शेतकरी आतुरला
ढवळ्या पवळ्याच्या साथीने
शेतामध्ये उतरला
शाळे मध्ये जाता जाता
मुले चिंब ओली झाली
छत्री मध्ये वारा घुसून
छत्री उलटी हो झाली
घरी घमघमाट सुटला
बेत कांदा भजीचा हो झाला
कांदा कापता कापता
डोळ्यामध्ये पाऊस आला
झाले रस्त्यावरी खड्डे..
की खड्ड्यामध्ये रस्ते..
गाडी चालवा वो तुम्ही
आहिस्ते..आहिस्ते..
आहिस्ते..आहिस्ते..
