STORYMIRROR

Jayesh Madhav

Others

3  

Jayesh Madhav

Others

पांडुरंग

पांडुरंग

1 min
234

भूलोकिचे वैकुंठ असे पंढरपूर

माय माऊली सर्वांची ईथे पांडुरंग ।।


सत्य त्रेता व्दापार कली युगे चार

उभा असे विटेवर ईथे पांडुरंग ।।


टाळ मृदुंगाचा गजर, किर्तन अभंग

आनंदे भरीतसे ईथे पांडुरंग ।।


सगुण निर्गुण भक्ती विठ्ठलाची

प्रेमभाव देखे ईथे पांडुरंग ।।


अखंड विश्वाचे दैवत हे थोर

भक्ती भाव धर्म ईथे पांडुरंग ।


साहित्याला गुण द्या
लॉग इन