हेच तर मन असते
हेच तर मन असते
1 min
176
एकांताच्या भींती तोडून
दूर कुठेतरी भटकत असते
क्षणात ईथे तर क्षणात तीथे
हेच तर मन असते..
कधी सुखाचा ओलावा
कधी दुखःचा पाझर असते
डोळ्यांवाटे दिसणारे ते
हेच तर मन असते..
कधी कोणाला उमगत नाही
धुक्यातील स्वप्नांसारखे
शोधुनही सापडत नाही ते
हेच तर मन असते..
जाणीवेच्या पलिकडे
आभासांचा पाठलाग करीत
सारे जग ते व्यापून असते
हेच तर मन असते.
