STORYMIRROR

Jayesh Madhav

Abstract

3  

Jayesh Madhav

Abstract

मौन

मौन

1 min
372

आकाशाकडे बघत रहा

मन शांत होईल..

पक्षी होऊन उडत रहा

पंखात बळ येईल..


न बोललेल्या शब्दांमधून

स्वतःला ऐकत रहा..

भुरळ पडेल तुझीच तुला

आकाशात तरंगत रहा..


शांततेत ही एक ताल आहे

एक गोड कविता आहे..

रात्रीच्या भयाण काळोखात ही

एक हवे हवेसे मौन आहे..


मनाच्या खोल कोलाहलात

हताश शब्दांची झळ आहे..

मौनातल्या शांततेतही

तुझी न् माझी तळमळ आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract