शून्यातली नजर
शून्यातली नजर
1 min
490
शून्यातली ती नजर सांगते
वादळवाटे वरचे काटे..
किती भोगले किती साहीले
डोळ्यांमध्ये अश्रू दाटे..
रोजच जगणे, रोजच मरणे
भय मनी ना कधीही वाटे..
मनातून जरी सागर वाहे
धुसर तरीही धुकेच दाटे..
अस्पष्ट भावना अधीर मनाची
कोलाहल हा मनास वाटे..
मोजमाप ना शब्दांमध्ये
बोचतात हे मनास काटे..
उत्कटतेची लाट अशी ही
उखडेल का हृदयी वाटे..
शून्यातली ती नजर सांगते
वादळवाटे वरचे काटे..
