मनिकर्णिका
मनिकर्णिका
झाशीची राणी ती
लक्ष्मीबाई शूर
काशी गावा जन्म
आकर्षक नूर.......१!!
मनिकर्णिकाचे
मनू नाव गोड
शौर्या आणि धैर्या
नसे तिच्या तोड.......२!!
मोरोपंत तात
आई भगीरथी
आईच्या पश्चात
स्वतःची सारथी.....३!!
वडिलांसोबत
दरबारी जाई
युद्धशास्त्र तिला
शिकण्याची घाई........४!!
निशाणेबाजी नि
घोडेस्वारी आली
आत्मरक्षा निती
पारंगत झाली.........५!!
झाशी महाराज
गंगाधर राव
लग्न होता तिचे
लक्ष्मीबाई नाव........६!!
