STORYMIRROR

Umesh Parwar

Abstract

4  

Umesh Parwar

Abstract

शीर्षक: नरकचतुर्दर्शी

शीर्षक: नरकचतुर्दर्शी

1 min
530

दरवर्षी येणारी दिवाळी

नरकचतुर्दर्शी पर्यत येऊन पोहचली

माणसाने केली विटंबना सुरु

नरकासुरालाच आग लावली.... 

नरकासुर हा दानवीशुर नक्की होता

कृष्ण वंध करणारा कपटी मनात होता

तुळसी समोर कायटान फोडून तुम्ही

गोविंदा गोविंदा नामस्मरण करत होता.... 

अखेर मौजमौजेत सण ठरविला 

आनंद गोकुळात पोहे खाऊ लागलात

हत्येची ती रात्र नर्कलोकी शोक करत आहे

दिवाळीची पणती आहे दारावरती पेटत.... 

क्षणभर विचारात कडूवृती मनात

आली आनंदात कळू दिली नाही

नरकासुराच्या हत्येशिवाय कधीच

तुमची दिवाळी झाली नाही.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract