शिर्षक : भाषा माणसाची....
शिर्षक : भाषा माणसाची....
1 min
0
वेडाखुळा हा इथेच
सुख दु:खात नादुनी
संसार करीतो आम्ही
स्रीपुरुषाला भुलूनी...
जन्मास येऊन असे
जगतो आपण सारे
भयभीत रात्र करी
माणसाला हेची सारे...
भोळेपणात हे विश्व
जिंकून घ्यावे सगळे
हसलो आणि रडलो
सरणावर सगळे...!
निदा ही केवळ एक
रित भाषा समाजाची
कळली ती नाही आम्हा
कधी भाषा माणसाची...
दुख हेची साक्षात्कार
अमर जीवन आहे
जगणे सह्य वेदना
तेची कर्मभोग आहे...
नाव : उमेश लक्ष्मण परवार,गोवा .
मो. ९६३७१६४१८९
