शिर्षक : शिव शिव....
शिर्षक : शिव शिव....
भाकरीच्या तुकड्याची किंमत
भुकेलेल्या उपाशी गरीबाला विचारा
आणि
धर्म म्हणजे काय ? ते भटक्या समाजातील
वंचित लोकांना विचारा,
जात छळ आणि मारहाण
करून सदैव वगळलेल्या
जातीची किमया थंडगार
बर्फासारखी तशी लाव्हाहीसारखी
भडकला तर मरेपर्यंत सोडत नाही
जीव लावलातर जीव असेपर्यंत सोडत नाही
ही माणूस कथा रथासारखीच
शिव शिव गजर करणारी माणसं
अजून ही संस्कृती धर्म पाळत
मासिक पाळी सारखी वावर करणारी
कुठेतरी कोप-याच्या बाजूला आहे
त्यावर अन्याय अजूनही होत आहे
शिव शिव शीवाशिवीचा बाण
काळजाला लागून बळी गेलेली
ही माणस कधी साहित्यात
काळया शब्दात बंदिस्त आहे
जशी शिवभक्ती रावणाची वंध दैना
तशीच चिरडून गेलेली जाते
सोन्याचा कळस चढविलेल्या
उंबरठ्यावर अजूनही पिढ्यान पिढ्या
जठाधीश गंगा बंदिस्त मस्तकी
वास्तव करून पावन झालेल्या पापाला
धुवून ही बुडबुड करणा-या पंच तलावात
वाहू पाहते पुण्य तत्वासाठी आजवर
कुणीही कर्मपापाशिवाय जन्मच घेत नाही
हे रिंगण तोडण्याची कुणाचीही हिंमत
झालेली नाही भूतलावर उत्तर शोधण्याचा
विरह अजूनही बाईत दंगा करत आहे पदराचा
शिव शिव बाजारात नग्न नागेश्वर
रक्षणधारी नदी उपासना करत आहे
शिवाची ओम नम : शिवाय
हर हर महादेव हर हर महादेव
आम्ही फक्त भक्तगण झालो
जन्माशी येऊनी पहा रे इथे
शिवभक्त ताडंव करत आहे
रावणाच्या बलीदानानंतर...!
नाव : उमेश लक्ष्मण परवार ,गोवा
मो. ९६३७१६४१८९
