शिर्षक : वर्सल...
शिर्षक : वर्सल...
गावोगावी परंपरेचा मंदिराच्या उंबरठ्यावर
वाजणारा ढोल हा ताशा शहराकडे
आकर्षक कमाई करत आहे
गावात वर्सलचा ढोल ताशा वाजत आहे
अख्या पिढीची कथा म्हणजे ही वर्सल
पुन्हा पुन्हा गावाबाहेर असलेल्याची
जाणिव करून देत आहे प्रत्येक माणसाला
जीवनाची भरकटलेली ती पाऊले
दुनियादारीची भाषा मतलबी
जरूर आहे फक्त उपयोग करून
घेत आहेत अपुल्यापरीने
शेणकुळ जळाव तेवढ धुरासारखं
दमडी ही कमाईचा हिणकस
असली तरी अजूनही हा ढोल ताशा
देवाच्या मंदिर पायरीवर ऐकू येत आहे
जागे व्हा सावध व्हा अंधार पसरत आहे
स्वत ला सावरणे अजूनही कठीण
होत आहे मनुवादी सनातनी वृतीतून
समाज अजूनही ढोल ताशा बडवत
स्वत:लाच दोष देत ग्राहणे गात आहे
वर्सलाचा ढोल शहरात कमाई करत आहे
लाखोंच्या लाखो नृत्य पद बडवून
सरकार हिणकस असलेल्या माणसाची
संस्कारी भाषेची टिक्कल उडत आहे
नाव : उमेश लक्ष्मण परवार ,गोवा.
मो. ९६३७१६४१८९
