STORYMIRROR

Umesh Parwar

Others

4  

Umesh Parwar

Others

शिर्षक : अबोलभाव....

शिर्षक : अबोलभाव....

1 min
3

तिच्या मनातून कसा ? उतरुन गेलो 

हे कळलच नाही मला

ते दिवस संपले भेटायचे हसायचे

तिच्या डोळ्यात ही पहायचे


सुंदर दिसायची ती, हे आत्ता समजू लागलय

शृंगारिक व्हायची ती, भावनेतून सदाच

इतके प्रेम नकळतपणे झाले तेव्हा

अन् दुराव्याचे निखळ आज वादळ आलयं


थांबलो नाही मी अन् तीसुद्धा 

तेच भाव तिच्या मनात अजूनही

जिवंत आहेत एक एक लाटासारखे

फेसाळण्यासाठी मिठीत अजूनही


तिचा बीन स्पर्शाचा अवयव 

अजूनही धुमाकूळ करत आहे नजरेसमोर

वाळवंट झालो मी तिच्याशिवाय

खरंच समाजात माणसाच्या अनेकासमोर


शेवटचे दोघांचे ही "अबोल भाव..."

कवितेला बहर देत सुटले समाजात

नकळत आत्ता भेटलो तर काही ही होऊ शकत

हे भावनिक सत्य "ती" लपवते लाज्जेसाठी


भेटलो तर वादळ निर्माण नाही

तर, 

खळखळाट होईल नदीचा अन् सागराचा

पुन्हा एकदा रत्नासाठी सागरमथंन.....!


नाव : उमेश लक्ष्मण परवार, गोवा. 

मो. ९६३७१६४१८९


Rate this content
Log in