STORYMIRROR

Umesh Parwar

Others

3  

Umesh Parwar

Others

शिर्षक : देहाचा बाजार झाला....

शिर्षक : देहाचा बाजार झाला....

1 min
10

कविता कल्पनादायक जरी असली

तरी, 

सत्य सांगत जाते माणसाचे जीवन

दु:खाचा झरा उमळू लागतो

सागर ही एक लाट फेसाळते किनारी येऊन


काही पदर असलेल्या भावना

आकर्षित होत जातात माणसाच्या

भ्रमित मनाच्या काव्यात तरंगत

कसातरी ? जीव ओलांडून जातो पैलतीरावर 


आनंदाचा वारा फिरे चोहीकडे

पानाफुला झोका घेई संसाराकडे

नीजती चंद्र लपून हा लिंबोनी मागे

केवळ जीवन सत्य युग भोग आहे भूवरीकडे


मनी नजरेचे चाळे चित्रीत होतात

तेव्हा हदय काळ आहे धगधगत 

कधी उशावर खेळ होई दोघांचा

मोह मज नाद लावी असे मैफिलीत


छंद खुळा देहाचा बाजार करतो

अपमान स्वतःचा स्वतः पापासारखा

पानगळ एक लहर येता कळे जीवन

बरसता विरह एकदा कवेत मिठीसारखा


नाव : उमेश लक्ष्मण परवार, गोवा. 

मो. ९६३७१६४१८९



Rate this content
Log in