शिर्षक : इथेच थकलो...
शिर्षक : इथेच थकलो...
लिहून गेले कित्येकजण
सत्य इतिहास तरीही
अमान्य ठरले ते माप
उंबरठ्यावर
शब्दाची करूनही नाव
सोडली गंगेत तरीही
धुऊन शकलो आम्ही
पाप ते माणसाचे
आली भरती मूर्खांचीच
तिथे जिथे पाणी होते
पोहू न शकलो आम्ही
जेव्हा सागरात
आसवे कमी परकीय ठरली
जेव्हा स्वातंत्र्याची गजल
गावोगावी दवंडी फिरू लागली
हक्कासाठी
नकोस सांगू कथा देवाधर्माच्या
इथे माणसाला जगणे
कठीण ठरले श्वास असेपर्यंत
माणुसकीच्या
डाव खचका जरुर आहे
माणसाला माणसात जगताना
किडे,जीव, किटकजतू अजरामर
ठरले शेवटी वारुळात
