शिर्षक : नशीबवान
शिर्षक : नशीबवान
1 min
0
भूमीवर या युध्दच घडले
घातपाताने जगणे कठीण झाले
युध्दाने वैभव ही संपले
रक्ताचे इथेव्हाळ वाहले
किती ? अहंकार माणसा
रडणे महाग झाले
सरणावर न जळता देह हे
दफन मातीत झाले
पराक्रमाचा विदुषक होतो
होतोच एकच पुतळा
जणू जिथे अन् तिथेच
दिसे सज्जन माणसा बाहुला
शोध घेत जातो सत्याचा
वैभव सोडून सगळे तेची
जाणिले समाजाचे भोग तरी
मरण झाले नशीबवान हेची
नाव: उमेश लक्ष्मण परवार, गोवा.
