STORYMIRROR

Umesh Parwar

Others

4  

Umesh Parwar

Others

शीर्षक: रंगमंचाचा फकीर....

शीर्षक: रंगमंचाचा फकीर....

1 min
0

नाही केवळ बाजार कलेचा,रंगमंच हा खेळ नव्हे,

नाटक म्हणजे जिवंत अनुभव, वेदनेचा हा जीव अहे.

तीन घंटांच्या नादामागे, सत्य जगाचे उभे राही,

कलाकाराच्या काळजात या, समाजाची व्यथा वाही


उंबरठ्यावर उभा राहतो,फाटक्या या लुंगडीत फकीर,

हसतील लोकही गरिबीला पण,तोच घडवतो नवी तकदीर

तोच काळ बनून येतो मग, समाजातल्या जागृतीचा,

कलेमधुन तो मार्ग दाखवी, न्यायाचा अन् संस्कृतीचा


संवाद जेव्हा काळजावरती, हातोडीचे घाव घालती,

अनावर अश्रू डोळ्यांतून मग, वेदनेची नदी बनती

त्या आसवांच्या सागरामध्ये, शोधतो मी तो किनारा,

बुडत्या सूर्याच्या किरणांतून, गवसेल का युगाचा तारा?


पक्षी, माणसे, अनेक जीव, इथे पाहती खेळ हा सारा,

पण शोधतो मी युगे युगे, या युगाला बदलणारा तो देव्हारा

रंगमंचावर जन्म घेउनी, तीन तासांचा खेळ मांडतो,

समाजाच्या या कुटुंबाला, जगण्याचा तो अर्थ सांगतो.


झोपडीमध्ये जरी पसरले, षडयंत्राचे घनदाट अंधार,

काटेरी या झुडुपांमधून, फुलायचा आहे प्रकाशाचा बहार

मी आसवांचा पूर जरी, पण क्रांतीची एक मशाल आहे,

कारण नाटक केवळ मनोरंजन नव्हे, तर जगण्याचा तो काल आहे


नाव : उमेश लक्ष्मण परवार, गोवा. 

मो. ९६३७१६४१८९


साहित्याला गुण द्या
लॉग इन