STORYMIRROR

sarika k Aiwale

Abstract

4  

sarika k Aiwale

Abstract

जाग..

जाग..

1 min
543

मिटूनी पाकळ्या घेता परतुनी पहाटेची आस जागे

थकल्या पावले आता नव्याने जगण्याचे बळ मागे

शांत जाहला तो किनारा आसमंती ती सय जागे

अंतरी कोलाहल कसला जीव कशास उदार वागे

नकोश्या जाहल्या दाही दिशा उगा सांजवातीमागे

सोडुनी वाटा पुन्हा नव्याने संघर्षाची कहाणी सांगे

सांज जीवनी निरवता स्वाप्नांत माघार घ्यावी लागे

परतुनी ऊदयास आता संघर्ष असा नवा मनी जागे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract