STORYMIRROR

Madhuchandra Bhusare

Abstract

4  

Madhuchandra Bhusare

Abstract

भाव

भाव

1 min
587

बंगल्यात राव राहतो, बंगल्यास ठाव आहे

झोपडीस माझ्या कवडीमोल भाव आहे


सोनेरी झुंबराखाली झुलतात मदहोश हत्ती

लिलावात विकलो आमचे कुठे गाव आहे?


काजू, बदाम, अंजीर त्यांच्या दिमतीला

तो मजेत आहे, आम्ही विवंचनेत आहे


चोरून बैल चरतो हिरव्या कुरणात

ते खाण्यात व्यस्त, आमचे रान फस्त आहे


आमच्या उलटीमधुनी फक्त रक्त येते

त्यांच्या उलटी मध्येही हाय प्रोटिन आहे


शिळ्या भाकरीत पाहतो आम्ही पंचपक्वान्न

तुमच्या घरात तिची जागा कचराकुंडीत आहे


कुत्राही मजेत लोळतो बंगल्यामध्ये त्यांच्या

कष्ठाळू माणसांची इथे दुनिया बकाल आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Madhuchandra Bhusare

भाव

भाव

1 min वाचा

Similar marathi poem from Abstract