STORYMIRROR

Padmakar Bhave

Abstract

4  

Padmakar Bhave

Abstract

तुझं असणं

तुझं असणं

1 min
523

तू चंद्र प्रभावळ लेवून येतस

आणि न्हाऊन निघतं

शुभ्र तेजात माझं अंगण... !

माझं तुळशी वृंदावन

तुझ्या सौम्य स्निग्ध नेत्रकडांच्या ज्योतित...

सचैल शुचिर्भूत होतं;

तेव्हा प्रगटते एक शुभ्र मूर्ती

माझ्या मनाच्या गाभाऱ्यात!

तिथे असते एक वात...,

जी तुझ्यासाठीच तेवत ठेवलेली असते मी!

मला साद घालत,ओढून नेते

तू अंथरलेली चैत्रपुनव...!

तुला पाहताना मला फुलं

येतात...सबाह्य!

तुझ्या नुसत्या असण्यानेच

भरून वाहतो गाभारा...!

मी पापण्या बंद करून घेतो तेव्हा...तुला साठवून ठेवतो

त्यात...!

पण तू?.....

पापण्यांच्या चोर वाटेने जातेसच ओघळून!

ह्या तेजाश्रूंना मी नाही थोपवू शकत...!

मी तृप्त असतो तेव्हा!

अगदी तृप्त..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract