हे विधात्या
हे विधात्या
हे विधात्या....
कवितेचं नसतं वरदान मिळालं मला तर..
किती काळ सोसावा लागला असता हा शापित जन्म?
गत जन्मीच्या किंवा
याच जन्मीच्या शापांवरचा हा
काव्योश्याप म्हणजे असीम वेदनांवरची अलवार फुंकर,
परमेशा,
तुझ्या या वरदानासाठी
मी कसे जोडावेत हे तोकडे हात?
वाळवंटाच्या प्रवासात-
तू देऊन ठेवलास माझ्या उरी
शब्दझरा!
विधात्या,
असलाच पुढील जन्म वगैरे,
आणि नसेल माझ्या नशिबी
पुन्हा एकदा हा शब्दोत्सव..
तर...
अन्य कोणताही जन्म दे
किड्या मुंगीचा किंवा दगडाचाही,
पण नको तो अशब्दाचा जन्म!
माझं पान उलटवतांना,
बस.. एवढं लक्षात ठेव 🙏
.
. ---पद्माकर भावे.
